पंतप्रधानांच्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा ! यंदाची दिवाळी देखील भारतीय जवानांच्या सोबत (व्हिडिओ)

पंतप्रधानांच्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा ! यंदाची दिवाळी देखील भारतीय जवानांच्या सोबत (व्हिडिओ)
Share

नवी दिल्ली- देशभरातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवणारा उत्सव असल्याचं त्यांनी सांगितले. याबाबत पंतप्रधानांनी एक्स वर व्हिडिओ शेअर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाची दिवाळी आपण भारतीय जवानांसोबत साजरी करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त संपूर्ण देश रोषणाईने उजळून निघाला आहे. प्रकाशाचा हा उत्सव अंधाराविरुद्ध लढण्याचा आणि सकारात्मकतेचा संकल्प करण्याची प्रेरणा देतो. देशातील सर्व नागरिकांना त्यांनी दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा दिल्या. येणारा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

यंदाची दिवाळी आपण भारतीय जवानांसोबत साजरी करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले की, दरवर्षी सीमेवर आणि देशाच्या विविध भागांत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आपला नित्यक्रम आहे. यंदाही ही परंपरा कायम राहणार असून, देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Vedh News