Breaking ! पिंपरी चिंचवड पालिकेत एसीबीचा छापा, पालिकेतील मुख्य अभियंत्याला घेतले ताब्यात

पिंपरी- पिंपरी चिंचवड महापालिकेत आज, गुरुवारी एसीबीने छापा टाकून महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एका ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ओंभासे यांच्यावर आहे.
या प्रकरणाची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने पिंपरी चिंचवड महापालिकेत छापा टाकून प्रमोद ओंभासे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका ठेकेदाराकडून त्याला काम मिळवून देण्यासाठी १९ हजार रुपयांची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर ओंभासे यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली.
या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका वर्तुळात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान या कथित कारवाईमागील नेमके कारण, चौकशीचे स्वरूप आणि ACB कडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.






