ब्रेकिंग न्यूज

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये सत्कार, शिंदे यांचे अस्खलित इंग्रजीतून भाषण

Share

लंडन- ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यावेळी सत्काराला उपमुख्यमंत्री शिंदे यांचे इंग्रजीत केलेले भाषण खूप गाजत आहे. आपल्या भाषणातून महाराष्ट्राचा विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, नागरिक-केंद्रित प्रशासन आणि पायाभूत सुविधांची माहिती मांडली.

शिंदे यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सन्मानाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी जवळपास अर्धा तास इंग्रजीमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून ते दिवंगत ज्येष्ठ कवी सुरेश भट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेचा मुद्दा मांडला. भारत-ब्रिटन संबंधांबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात केलेल्या कामांची माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचा देखील उल्लेख केला.

“नमस्कार! जय हिंद! जय महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराज की जय! भारत माता की जय! या ऐतिहासिक सभागृहात पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मिळत आहे. हे सभागृह लोकशाही, अनेक महत्त्वाच्या चर्चासत्रांच्या गेल्या अनेक दशकांचे साक्षीदार आहे. मी विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा सन्मान आहे”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DdGvApetmRv/?utm_source=ig_web_button_share_sheet