ब्रेकिंग न्यूज

गिरीश प्रभुणे यांना सोलापूर विद्यापीठाकडून सन्माननीय ‘डि.लिट’ प्रदान

Share

सोलापूर- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आज, गुरुवारी ‘डि.लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल मा राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू लक्ष्मीकांत दामा आदी उपस्थित होते.

१९७० च्या काळात विद्यार्थी आंदोलन गिरीश प्रभुणे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता म्हणून त्यांना पुणे विद्यापीठाने पदवी परीक्षेला बसू दिले नव्हते. प्रभुणे यांनी सोलापूर,धाराशिव, यमगरवाडी या भागात पंचवीस-तीस वर्षाहून अधिक वर्षे भटक्या विमुक्त समाजासाठी अथक परिश्रम घेऊन, संघर्ष करून काम केले आहे. त्यांनी ‘यमगरवाडी’ सारखा प्रकल्प उभा केला. त्याच भूमीत त्यांना सन्माननीय ‘डि.लिट पदवी प्रदान केल्याबाबद्दल क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.