पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) दोन शल्यचिकित्सकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईच्या प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.
विनापरवाना गैरहजेर राहणे आणि गैरवर्तणुक करणे या कारणामुळे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
डॉ. ज्ञानेश्वर बोराडे (सहायक प्राध्यापक, सर्वसाधारण शल्यचिकित्सक), डॉ. बालाजी धायगुडे (प्राध्यापक, सर्वसाधारण शल्यचिकित्सक) अशी बडतर्फ केलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
डॉ. ज्ञानेश्वर बोराडे तब्बल १ हजार ३५३ दिवस विनापरवाना गैरहजर राहिले. त्यांच्या या प्रदीर्घ गैरहजेरीमुळे रुग्णालयातील वैद्यकीय अध्यापन आणि रुग्णसेवा या दोन्हीत मोठा अडथळा निर्माण झाला. डॉ. बालाजी धायगुडे यांना त्यांच्या कामातील गैरवर्तणुकीमुळे सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे.
