ब्रेकिंग न्यूज

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद ; या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Image of a faucet spouting water. Useful image for any theme involving ecosystems, agriculture, drought, and conservation.
Share

पुणे- महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, (दि. ३०) या केंद्राच्या अंतर्गत परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

शुक्रवारी, (दि. ३१) रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद ?

लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजर परिसर- खराडी गावठाण, ईऑन आयटी पार्क परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, चंदननगर, सुनीतानगर, सोमनाथनगर, गणेशनगर, आनंद पार्क, महावीरनगर आणि मुन्नुरवार सोसायटी.

रामटेकडी टाकी परिसर- काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण अंशतः, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधीनगर, रामटेकडी एसआरपीएफ, वैदूवाडी, भीमनगर, ससाणेनगर, मुंढवा, मगरपट्टा सिटी, केशवनगर, हांडेवाडी रोड आदी.

ठाकरसी टाकी परिसर – येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामातानगर, मदर तेरेसानगर, कल्याणीनगर, संगमवाडी, शास्त्रीनगर आणि नगर रस्ता परिसर.

हाय सर्व्हिस, सेंट्रल कॅम्प व रेसकोर्स टाकी परिसर- बी. टी. कवडे रोड, घोरपडी अंशतः, भारत फोर्ज परिसर, सेंट पॅट्रिक टाउन, संपूर्ण पुणे कँटोन्मेंट, कॅम्प परिसर, कमांड हॉस्पिटल, ईस्ट स्ट्रीट, पासपोर्ट कार्यालय परिसर, कोरेगाव पार्क ब्रिज आदी.

वानवडी व बकरी हिल टाकी परिसर – वानवडी गावठाण, कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझादनगर, केदारीनगर, शिंदे छत्री परिसर, संविधान चौक ते गंगा सॅटेलाइट चौक आदी.