विद्यानंद बापट यांच्या सहित २० जणांचे पोलीस संरक्षण काढले

पुणे- पुणे पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यासह २० महत्वाच्या व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील महत्वाच्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याचा अधिकार पोलीस आयुक्तांना असतो.
पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्तांनी अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातो. यामध्ये कोणाला पोलीस संरक्षण द्यायचे, कोणाचे संरक्षण काढून घ्यायचे याबाबत दर दोन महिन्यांनी होणाऱ्या आढावा बैठकीत घेतला जातो. या संदर्भातील बैठक २३ ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यामध्ये विद्यानंद बापट यांच्यासहित २० जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय झाला.
विद्यानंद बापट (ध्वनी प्रदूषण कार्यकर्ते), सायरस पुनावाला (सिरम इन्स्टिट्यूट), पुनीत बालन (उद्योजक), संजय नहार (सरहद संस्था), तेहसिन पुनावाला (राजकीय विश्लेषक), आशिष सातपुते (वकील), शेखर मुंदडा आदींचा यात समावेश आहे. मात्र बारामती येथील हल्ल्यात जखमी झालेले उद्योजक राणा सूर्यवंशी आणि लक्ष्मण हाके यांचे पोलीस संरक्षण तूर्तास कायम ठेवण्यात आले आहे.






