शिक्षकाला मारहाण; संस्थेच्या खजिनदारासह सचिवावर गुन्हा दाखल

शिक्षकाला मारहाण; संस्थेच्या खजिनदारासह सचिवावर गुन्हा दाखल
Share

पिंपरी – शिक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी संस्थेच्या खजिनदारासह सचिवाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रुपीनगर, तळवडे येथील नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. २३) रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास घडली. 

दिलीप दत्तात्रय पांडुळे (वय ३९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, शाळेत काम करत असताना संस्थेच्या खजिनदार किशोर गोंड आणि सचिव आशिष गोंड यांनी त्यांना कार्यालयात बोलावले. विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नसल्याचे आणि पालकांच्या तक्रारी असल्याचे सांगितल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.

या वादातून आरोपींनी शिवीगाळ करत पुन्हा शाळेत दिसल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भिंतीवर ढकलल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Vedh News