ब्रेकिंग न्यूज

विद्यानंद बापट यांना मारहाण ; माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी केला हल्ला

Share

पुणे- गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सवात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी अशी मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर विद्यानंद बापट हे नाव घराघरात पोचले आहे. याच विषयावर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. या मुद्द्यावर पुण्यातील विद्यानंद बापट यांनी आग्रही मत मांडले होते. त्यांनी डीजेचा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे असे म्हणत विरोध केला होता. टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधींशी गणेशोत्सवातील डीजेबाबत स्वत:ची भूमिका मांडत असताना एक तरुण अचानक आला आणि त्याने विद्यानंद बापट यांना मारहाण केली. त्यानंतर काही जण आले आणि त्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला रोखले. ही संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली.

या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना विद्यानंद बापट म्हणाले की, तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलीस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्..सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलीस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही असे बापट म्हणाले.