भोसरी येथील अतुल रघतवान खून प्रकरणी दोघांसह ३ अल्पवयीन ताब्यात ; २४ तासात भोसरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी – भोसरी येथील देवकरवस्ती परिसरात घडलेल्या अतुल तानाजी रघतवान खून प्रकरणी भोसरी पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन प्रमुख आरोपींसह तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सत्कारसिंग सतनामसिंग भोंड (वय ३६ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), पवन धनंजय गुप्ता (वय १८ वर्षे ५ महिने, रा. देवकरवस्ती, भोसरी) आणि तीन अल्पवयीन बालके आहेत.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी देवकरवस्ती, भोसरी येथील ‘प्रोटॅक’ कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अतुल तानाजी रघतवान याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मृताचा आतेभाऊ करण उर्फ गणेश तानाजी करवंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भोसरी तपास पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याचे नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, यासंबंधी अधिक तपास सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) नाथा घार्गे करत आहेत.
ही कामगिरी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त मारूती जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस निरीक्षक नाथा घार्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ टापरे, पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे, सपोफौ बोयणे, पोलीस अंमलदार बांबळे, डामसे, मोरे, माने, खाडे, गारूडकर, वाटकर, ढेरे, ताटे आणि तांत्रिक विश्लेषक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव (परिमंडळ ३) यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.






