ब्रेकिंग न्यूज

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू ; गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना 

Share

मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू गणपती आगमन मिरवणुकीत घडली दुर्घटना

मुंबई – मुंबईतील भुलेश्वर परिसरातील आगमन मिरवणुकीत २२ फूट उंच ‘भुलेश्वरचा राजा’ या गणपतीची महाकाय मूर्ती मंडपापासून अवघ्या ५०-६० फूट अंतरावर असताना अचानक कोसळली. शनिवारी (दि.२२) रात्री ९:५१ च्या सुमारास बलराम मर्चेंट रोड, जय अंबे चौक भुलेश्वर या ठिकाणी ही दुर्घटना घडली. या  दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे (३३) आणि पदाधिकारी बृजेश हेमंत जोशी (३०) यांचा मृत्यू झाला आहे. ५ जण जखमी झाले असून त्यात दोन लहान मुलींचाही (वय ५ आणि ७ वर्षे) समावेश आहे. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूर्तीचा तोल गेल्यामुळे किंवा सपोर्टिंग स्ट्रक्चर बोल्टमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस व मुंबई अग्निशमन दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.