पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी सेवानिवृत्त
Share

पिंपरी-पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस अधिकारी व अंमलदार सप्टेंबर २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे आयोजित करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र सदाशिव आहेरराव, संजय व्यंकटेश कामठे आणि लक्ष्मण सहादू बुर्डे यांचा समावेश आहे. रवींद्र आहेरराव व संजय कामठे हे वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून, तर लक्ष्मण बुर्डे हे पोलीस मुख्यालयात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

या कार्यक्रमात पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतिचिन्ह, झाडाचे रोप व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Vedh News