ब्रेकिंग न्यूज

मुंढे का झटका ! कर्मचाऱ्यांची नखे वाढली म्हणून स्वीट अँड भेळपुरी हाऊसचा FSSAI परवाना निलंबित

Share

मुंबई- आपल्या धडक कारवाईमुळे प्रसिद्धीस आलेले आणि लोकप्रियता लाभलेले अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक दणका दिला आहे. एका कारवाईच्या दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांची नजर एका कर्मचाऱ्याच्या वाढलेल्या नखांवर गेली आणि त्यांनी थेट या स्वीट अँड भेळपुरी हाऊसचा परवाना निलंबित केला.

मालाड पश्चिमेतील ‘दिल्ली स्विट अँड भेळपुरी हाऊस’वर एफडीएने कारवाई केली आहे. एफडीएने या भेळपुरी हाऊसचा FSSAI परवाना तत्काळ निलंबित केला आहे. तुकाराम मुंढे (IAS) यांच्या निर्देशानुसार FDA ने ही कारवाई केली आहे. एफडीएने या स्विट अँड भेळपुरी हाऊसची पतासणी केली. या तपासणीत गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

एफडीएच्या तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या. 36 पैकी 26 अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्मचाऱ्यांची नखे वाढलेली होती. हातावरील जखमांवर पट्टी नसतानाही कर्मचारी अन्न हाताळत होते. अन्न व पाण्याच्या आवश्यक NABL-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या चाचणी अहवालांचाही तेथे अभाव दिसला. या सर्व विसंगती आढळल्यानंतर निलंबन काळात व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत.