पुणे – जागतिक दर्जाची स्वच्छता आणि गुणवत्तेचा दावा करणाऱ्या KFC अस्वच्छ कारभार उघडकीस आला आहे. पुण्यात बावधन येथील KFC च्या स्टोरेज सेंटरवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने ((FDA) धडाकेबाज कारवाई करून या सेंटरला कुलूप लावले आहे. या ठिकाणी तपासणीदरम्यान अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोल्ड-स्टोरेज सुविधा आवश्यक FSSAI परवान्याविना सुरू असल्याचे आढळले. तसेच दूषित पाणी, अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक यासंबंधीही गंभीर त्रुटी नोंदविण्यात आल्या. या उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA ने संबंधित सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
अन्नसाठवणूक आणि हाताळणी करणाऱ्या केंद्रांनी परवाना, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, यासाठी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
