भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ ऑक्टोबर पासून जनजागृती सप्ताह

भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ ऑक्टोबर पासून जनजागृती सप्ताह
Share

मुंबई- महाराष्ट्रामध्ये केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध तालुके, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.

सोमवारी (दि.२६) पुणे शहरातील जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा धिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे पोलीस आयुक्तालय, ससून रुग्णालय, महावितरण, इत्यादी कार्यालयातून तसेच आसपासच्या यवत, दौंड, भिगवण, इंदापूर, लोणी काळभोर परिसरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, ९१, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई येथे संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९२१२१२, २४९२२६१८, संकेतस्थळ https://acb.maharashtra.gov.in, ई-मेल acbwebmail@mahapolice.gov.in, addlcpacbmumbai@mahapolice.gov.in आणि व्हॉट्सॲप क्रमांक ८८२८२४१०६४ यांवर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे.

Vedh News