दिव्यांग बांधवांमध्ये प्रकाशवाटा पेरण्यासाठी साद सोशल फाउंडेशन कटिबद्ध – इरफानभाई सय्यद..
पिंपरी (वेध न्यूज ):- आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील? याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. दिव्यांग व्यक्तिंच्या शारिरीक कमतरतेची भरपाई मात्र, देवाने त्यांना मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ…
