ब्रेकिंग न्यूज

महिलेच्या मोबाईलवर मेसेज केला आणि जीव गेला, पुण्यातून इसमाचे अपहरण करत सांगलीत निर्घृण हत्या

सांगली – नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला. तीन तरुणांनी त्यांचे पुण्यातून अपहरण करून सांगलीला नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा ‘क्ल्यू’मुळे या भयंकर गुन्ह्याचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा झाला आहे. गोविंद माधवराव उपासे (वय 59, रा. तपोधाम सोसायटी…

Read More

कापूरहोळ चौकात उद्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पुणे सातारा महामार्गावरील वाहतुकीत असे आहेत बदल

पुणे – भोंगवली येथील जी एस प्रकल्पाच्या विरोधात उद्या रविवारी (दि. २३) शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या आणि ट्रॅक्टर सहभागी होणार असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे सातारा मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत. सकाळी ८ पासून आंदोलन संपेपर्यंत पुढील…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा कायदेशीर की बेकायदेशीर ; भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

पिंपरी – महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नगरसेवकांनी केलेल्या गोंधळात पार पडली. नियमित सर्वसाधारण सभेची सात दिवसांची पूर्ण नोटीस देण्यात आली नाही, तहकूब सभेतील विषय नियमित सभेत घेता येतात की नाही, याची महापालिका अधिनियमात स्पष्टता नसतानाही विषय कसे घेतले, असा सवाल करुन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सभा बेकायदेशीर असल्याचे…

Read More

भोसरी गावठाणात भाजप उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार

पिंपरी- विकासात्मक हिंदुत्वाचा विचार घेऊन पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प राबवले. मागील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील भाजपा युवा नेते रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भाजपचे खाते उघडले आहे. भोसरी गावठाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत, भोसरी गावठाण परिसरातील सर्व…

Read More

प्रेमसंबंधाच्या संशयाने पत्नीला संपवून पतीची आत्महत्या , खेड तालुक्यातील धक्कादायक घटना

पिंपरी- पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने पछाडलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली. प्रियांका मारुती इगवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून महादेव मारुती इगवे असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे…

Read More

श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही

भीमाशंकर- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची पाहणी करुन बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला. नवीन आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या निगडाळे परिसरातील वाहनतळ, बसस्थानक, विविध नागरी सुविधा आणि भक्तनिवास याबाबत…

Read More

एच. ए. स्कूल १९८७ बॅच माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन ‘ संपन्न

पिंपरी – वाढते सायबर गुन्हे रोखणे त्यावरील उपाय योजना तसेच आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयावर चर्चासत्र आयोजित करून तसेच ज्या विद्यालयात आपण शालेय शिक्षण घेतले त्या एच.ए. शाळेला मदत करणे या उदात्त हेतूने एकत्रीत येऊन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन चिंचवड स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाले. अनेकांच्या सुख-दु:खात सामिल होऊन सर्वाना मदत…

Read More

पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान 

 पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.       पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची…

Read More

७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य – पुणे पिंपरी-चिंचवड मधून हजारो भाविक संत निरंकारी समागमाचा आनंद घेणार

 आळंदी:(वेध न्यूज )   सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा ७७वा वार्षिक संत समागम १६,१७ व १८ नोव्हेंबर, २०२४ ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की…

Read More

कृषिपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारा सराईत गजाआड, १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

दौंड- कृषिपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या केबल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज गुलाब बिद (वय ३७ वर्षे, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या मांजरी फार्म, ता. हवेली) असे या चोरट्याचे नाव आहे. ग्रामीण भागात शेतातील विहिरी किंवा विंधन विहिरींवर…

Read More