लोकप्रिय ‘घरोंदा’ हॉटेल नूतनीकरणानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत दाखल !

लोकप्रिय ‘घरोंदा’ हॉटेल नूतनीकरणानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत दाखल !
Share

पिंपरी- मागील २५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवड खवय्यांना स्वादिष्ट आणि रुचकर व्हेज पदार्थांचा आस्वाद देणाऱ्या हॉटेल ‘घरोंदा’ आता नव्या देखण्या स्वरूपात पुन्हा ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. नूतनीकरण केलेल्या ‘घर आणि घरोंदा.. एक नवं नातं’ अशी टॅगलाईन असलेले ‘घरोंदा’ पिंपरी चिंचवडकरांबरोबर नवे नाते निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

पिंपरी-मोरवाडी रस्त्यावर २४ वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक किशोर दांगट यांनी घरोंदा हॉटेलची स्थापना केली. अल्पावधीतच या हॉटेलने लोकप्रियता संपादन करून पिंपरी-चिंचवडकर खवय्या मंडळींचे प्रेम संपादन केले. पंजाबी, गुजराथी, महाराष्ट्रीय, दाक्षिणात्य, कॉंटिनेंटल, चायनीज, व्हेज थाळी, पावभाजी, डेझर्टस, आईस्क्रीम असे विविध रुचकर स्वादिष्ट आणि आरोग्यपूर्ण शाकाहारी पदार्थ या ठिकाणी मिळतात.

आकर्षक इंटिरियर असेलला डायनिंग हॉल, विनम्र आणि आतिथ्यशील सेवा, प्रसन्न वातावरण आणि स्वच्छतेचे सर्व नॉर्म्स पूर्ण करणारे टापटीप असलेले किचन ही या हॉटेलची वैशिष्ट्ये आहेत. या शिवाय वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसे असे छोटेखानी घरगुती समारंभ साजरे करण्यासाठी प्रशस्त वातानुकूलित कॉन्फरन्स हॉल उपलब्ध आहे.

या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिंपरी-चिंचवडच्या अनेक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठी घरोंदा हॉटेल बैठकांचे केंद्रस्थान ठरले आहे. बऱ्याचदा इथूनच शहराच्या राजकारणाला दिशा दिली जाते. पिंपरी-चिंचवड शहरात होणाऱ्या प्रत्येक राजकीय पत्रकार परिषदा हॉटेल घरोंदामध्ये होणे हे एक प्रकारचा प्रेस्टिज पॉईंट ठरला आहे. त्याशिवाय सामाजिक सांस्कृतिक संस्था देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदा घेण्याला प्राधान्य देतात.

एकूणच या सर्व वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हॉटेल घरोंदा सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ग्राहकांच्या जिभेची चव पुरवण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहे.

 

 

Vedh News