अंगात भूत शिरल्याची बतावणी करत शाळकरी मुलीवर अत्याचार, भोंदूबाबाला अटक

सातारा – फलटण येथे शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करत जादूटोणा करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
सौरभ नाना मदने असे संशयित आरोपीचे नाव असून पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात पोस्को कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने पीडितेच्या अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करून अघोरी विधी केले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार केल्याचा आरोप आहे.
फास्टट्रॅक कोर्टात हा गुन्हा चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.






