ब्रेकिंग न्यूज

क्रिकेट खेळायला घेतले नाही म्हणून तुंबळ हाणामारी, शिक्रापूर मधील घटना

Share

शिक्रापूर – क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केली. हा प्रकार शिक्रापूर हद्दीत चाकण चौकजवळ तळेगाव रस्त्यावर घडला.

या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मकसूद जाफर अली खान (वय २६), हमीद रियाज खान (वय २५), सलामत जाफर अली खान (वय २८), बिलाल बरकत अली खान (वय २२)

सर्व रा. महाबळेश्वरनगर शिक्रापूर या चौघाना अटक केली. न्यायालयामार्फत त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपीनी बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांसह लाकडी बॅट आणि स्टंपने मारहाण केली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरूरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी पोलीस हवालदार अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे, पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, विकास बांगर, मछिंद्र निचित, आणि संतोष बाबर यांच्या पथकाने केली.