पुणे- गावठी पिस्तूल आणि काडतूस बाळगणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ विशेष पथकाने चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेऊन अटक केली.
आकाश उर्फ गजा अशोक मोरे आणि उज्ज्वल विनोद नव्हे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आर्म्स ॲक्टअंतर्गत करावे करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई लालू कऱ्हे आणि हरिप्रसाद पुंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने वडगावशेरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांकडून प्रत्येकी एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत राउंड असा एकूण दोन गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राउंडचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड आणि उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुशील बेंद्रे, गणेश इथापे तसेच पोलीस शिपाई लालू कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे, विलास केदारी, अमोल सरतापे आणि शुभम चिनके यांनी केली.
