ब्रेकिंग न्यूज

भोसरी येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

पिंपरी- मराठवाड्यात मागील दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उभी पिके भुईसपाट झाली असून हजारो दुभती जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या हवालदिल झालेल्या बांधवांना “मिशन मराठवाडा” अंतर्गत मदत देण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील पत्रकारांच्या शिखर संस्थेने केले आहे. त्या अंतर्गत…

Read More

पिंपरीत ७० फुट रावण दहन कार्यक्रम संपन्न

पिंपरी प्रतिनिधी – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने आयोजित भव्य ७० फुटी रावणदहन आणि मनोरंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पारंपरिक सणाचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कलाविष्कारांनी झाली. कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांच्या व सिनेतारकांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रावणदहनाचा कार्यक्रम…

Read More

साखर आयुक्त तावरे यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी- महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गाळप झालेल्या उसाचे थकीत एफआरपी, रिकवरी बेस रेट, आरएसएफ फॉर्मुल्यानुसार अंतिम बिलांची रक्कम दिली नाही. तसेच पंढरपूरच्या एका साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाचे शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि…

Read More

श्री भगवान गडावर दसरा मेळावा साठी पिंपरी मधून जाणार हजारो नागरिक – सदाशिव खाडे 

पिंपरी- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली.  शुक्रवारी चिंचवड येथे श्री भगवान गडावर जाणाऱ्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे,…

Read More

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात —मा नगरसेवक संदीप वाघेरे व मित्रपरिवार बीड सोलापूरकडे रवाना

पिंपरी प्रतिनिधी : बीड व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अशा संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून जाण्याचे कार्य संदीप वाघेरे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने हाती घेतले आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी जीवनावश्यक साहित्याचे किट तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष मदतपथक रवाना झाले आहे. या मदतीच्या उपक्रमात रि. पा. इं.चे…

Read More

संगीत नाटकांचा समृद्ध ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे – डॉ. वंदना घांगुर्डे

पिंपरी- संगीत रंगभूमीला १८२ वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. हा समृद्ध ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति: पूर्वरंग ते उत्तररंग’ या नाट्य महोत्सवात…

Read More

मोहननगर येथील समस्या सोडविण्याची अजित पवार यांची ग्वाही

पिंपरी -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात जनसंवाद सभा घेऊन शहरातील समस्या जाणून त्याचे निराकरण केले. यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय जगताप यांनी मोहननगर प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांच्या विविध समस्या मांडल्या. अजित पवार यांनी या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. तसेच अन्य समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार…

Read More

रंगानुभूति: नाट्य प्रयोगकला महोत्सव हा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होऊ शकतो – सतीश आळेकर

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये या महोत्सवाने कला संस्कृती क्षेत्रासाठीचे अधिक पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, ग. दि. माडगूळकर, आचार्य अत्रे, कै. अंकुश लांडगे, निळू फुले सभागृह अशी उत्तम व्यवस्था असलेली नाट्यगृह महापालिकेच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत. येथे भरपूर सोयी उपलब्ध असून अनेक कलावंत रंगभूमीची सेवा करत आहेत. येथील वाढता प्रतिसाद बघता…

Read More

पिंपरीतील महालक्ष्मी  मंदिरात  संदीप वाघेरे यांच्या वतीने मखर अर्पण

पिंपरी – शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, पिंपरी गावाचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मरीआई माता मंदिर येथे एक आकर्षक मखर उभारण्यात आले . हे मखर पिंपरीचे नगरसेवक मा. संदीप वाघेरे यांच्या वतीने, कै. नाथूभाऊ उर्फ रघुनाथ दिनाजी वाघेरे यांच्या पवित्र स्मृतिप्रित्यर्थ अर्पण करण्यात आले . या मखराची रचना पारंपरिक सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा संगम साधणारी असून, भक्तांना एक…

Read More

कलाविश्वात पिंपरी चिंचवडचे नाव अग्रस्थानी यावे – डॉ. जब्बार पटेल

पिंपरी – पुणे म्हणजे साहित्य कला क्षेत्राचे उगमस्थान अशी ओळख आहे. पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवामुळे या शहराची ओळख कला विश्वातही अग्रस्थानी घेतली जाईल.‌ महापालिकेने महोत्सवाला भरीव मदत करून शहराच्या…

Read More