पिंपरी वेध न्यूज – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने दि.१ जुलै रोजी डाॅक्टर्स डे,सी.ए.डे व फार्मर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रोटरी नवीन वर्ष २०२५-२६ ची सुरुवात गणपती पूजन, दिपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.डाॅ.संतोष मोरे, सचिव रो.डाॅ.योगश गाडेकर तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य यांच्या नावाची घोषणा मावळते अध्यक्ष रो.दिपक सोनवणे यांनी केली तसेच नवीन कार्यकारिणी सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवताना आपल्या क्लबचा नावलौकिक वाढवेल अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी रोटरी क्लबच्या वतीने नवीन भोसरी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी ढगे तसेच ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतुजा लोखंडे, तसेच भोसरी डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रफुल्ल नारखेडे भोसरी येथील शिवनेरी हाॅस्पिटलचे डॉ.योगेश गाडेकर, डॉ.पुजा गाडेकर, डॉ.अमितकुमार त्रिपाठी,अंकुर हाॅस्पिटलचे डॉ.अविनाश तळोले,आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ.पांडुरंग लांडगे, डॉ.संतोष मोरे, डॉअनिल.पवार, डॉ.कृष्णा दळवी,डॉ.नोएल झकेरिया, डॉ.ऋतुजा उचाळे यांना सन्मानित करण्यात आले.

सी.ए.नियाझ शेख आणि शेतकरी म्हणून श्री.बाळासाहेब कोते यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.प्रास्तविक सचिव रो.डाॅ.योगेश गाडेकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून दरवर्षी व्होकेशनल डे साजरा करण्यात येतो.यामध्ये डाॅक्टर,सी.ए.व जगाचा पोशिंदा बळीराजा यांचे समाजाप्रती असणाऱ्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेत असताना रोटरी सदस्य व कार्यकारिणी यांच्या सहकार्याने या नवीन वर्षात सर्व समावेशक काम करण्याचे रो.डाॅ.संतोष मोरे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.केशव काळदाते यांनी तर आभार माजी अध्यक्ष रो.दीपक सोनवणे यांनी मानले.यावेळी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी माजी अध्यक्ष रो.ज्ञानेश्वर विधाते यांनी डॉक्टर,सी.ए व बळीराजा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी सत्कारार्थींनी सत्काराला उत्तर देताना डॉ.ऋतुजा लोखंडे, डॉ.शिवाजी ढगे, डॉ.ऋतुजा लोखंडे,नियाज शेख,दत्तात्रय कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.
