नेहरूनगरमध्ये सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी- पिंपरीतील नेहरूनगर परिसरात सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली यमाहा कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल ए. व्ही. (वय २८, रा. ॲपल पॅराडाईज सोसायटी, गणेश मंदिर रोड, नेहरूनगर, पिंपरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
११ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली यमाहा कंपनीची FZ मोटारसायकल (क्रमांक MH-14-FL-7259) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दुचाकीची किंमत अंदाजे २५ हजार रुपये आहे.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत.
