मांजरी खुर्द येथे दोन्ही पाय बांधून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तरुणाची हत्या

मांजरी खुर्द येथे दोन्ही पाय बांधून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून तरुणाची हत्या
Share

पुणे- दोन्ही पाय दोरीने बांधून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून एका अनोळखी तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना मांजरी खुर्द परिसरात उघडकीस आली आहे. व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटदरम्यान नदीकाठच्या झाडीझुडपात हा मृतदेह आढळला.

७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास व्हीटीपी आणि गेरा कन्स्ट्रक्शन या दोन बांधकाम साईटच्या मधोमध असलेल्या झाडीझुडपात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तसेच डोक्यात सिमेंटचा सिपोरेक्स ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

मृत तरुण अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असून अंगात फिकट गुलाबी रंगाचा फुल शर्ट असून त्याने निळ्या रंगाचे जॅकेट व पॅन्ट, काळ्या रंगाचा बेल्ट आणि विटकरी रंगाची चप्पल परिधान केली होती. तसेच त्याच्या जवळ आकाशी रंगाचे वायरलेस हेडफोन आढळून आले आहेत.

त्यानंतर वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सुमारे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले होते. तसेच डोक्यात सिमेंटचा सिपोरेक्स ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या माहितीच्या आधारे पोलीस मृत तरुणाची ओळख तसेच त्याच्या हत्येचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक कोकरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Vedh News