शरद पवार मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळे यांची माहिती 

शरद पवार मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल, सुप्रिया सुळे यांची माहिती 
Share

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना बुधवारी पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. आता शरद पवार यांच्या कन्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण शरद पवारांना घेऊन मुंबईला जात असल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. यानंतर आता शरद पवारांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचीदेखील माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

“बाबांच्या पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. आपली काळजी, सदिच्छा आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत”, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितले आहे.

शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरु केला होता. त्यांनी बारामतीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीचा दौरा सुरु केला होता. त्यांनी बारामतीत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती.

बुधवारी ४ नोव्हेंबरला सकाळी त्यांना रुबी हॉल रुग्णालयातून डिस्चार्च मिळाला. पण त्यानंतर काही तासांनी त्यांना मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तिथे त्यांच्या काही टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती आहे.

Vedh News