रणजित शिरोळे यांचा मनसेला जय महाराष्ट्र! या पक्षात केला प्रवेश

रणजित शिरोळे यांचा मनसेला जय महाराष्ट्र! या पक्षात केला प्रवेश
Share

पुणे- राज ठाकरे यांच्या मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. रणजित शिरोळे यांनी मनसेची साथ सोडली असून त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील रणजित शिरोळे यांनी पक्षाचे काम केले होते. मात्र त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी २००९ मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.

त्यांनी मनसेचे राज्य सरचिटणीस म्हणून देखील पक्षाचं काम पाहिले आहे. त्यांनी २०२४ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रणजित शिरोळे हे मनसेच्या स्थापनेपासून पक्षासोबत होते. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचे काम केले. मार्च २०२३ मध्ये राज ठाकरे यांनी त्यांची मनसेच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली होती.

रणजित शिरोळे यांचा राजीनामा हा पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Vedh News