भोसरीत केमिकल आणि पेंटच्या गोडाऊनला भीषण आग

भोसरीत केमिकल आणि पेंटच्या गोडाऊनला भीषण आग
Share

पिंपरी – भोसरी बालाजीनगर परिसरातील दिव्या केमिकल अँड पेंट कंपनीच्या गोडाऊनला सोमवारी (दि.२) सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊन आणि आतील मालाचे प्रचंड नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा आणि फोमचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

दरम्यान, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Vedh News