शेअरबाजारातून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेची ८८ लाखांची फसवणूक

शेअरबाजारातून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेची ८८ लाखांची फसवणूक
Share

पिंपरी- ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस फायदा मिळविण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ४८ लाख ८८ हजार ८५ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. पुनावळे परिसरातील ३५ वर्षीय महिलेने याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

या प्रकरणी विल्यम अॅनालिस्ट नावाने संपर्क साधणारी व्यक्ती, टेलिग्रामवरील एक महिला, कस्टमर केअरच्या नावाने संपर्क करणाऱ्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुनावळे येथील बांदलनगरमध्ये घडली.

याबाबतची माहिती अशी की संशयितांकडून फिर्यादी महिलेशी टेलिग्रामवरून संपर्क साधण्यात आला. त्यांना ‘शेअर मार्केट ए-०३’ या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

टेलिग्रामवरील शेअर मार्केट ग्रुपमध्ये सहभागी करून विविध बँक खात्यांवर आर टी जी एस आणि ऑनलाईन पद्धतीने एकूण ४८ लाख ८८ हजार ८५ रुपये स्वीकारण्यात आले. मात्र गुंतवणूक न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. रावेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Vedh News