वाकडमध्ये भीषण आग ; सहा ते सात दुकानें जळून खाक

वाकडमध्ये भीषण आग ; सहा ते सात दुकानें जळून खाक
Share

पिंपरी- वाकड परिसरातील प्रीष्टीन ब्रो लाईफ येथील सहा ते सात दुकानाला आज, रविवारी पहाटे भीषण आग लागली. 

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत दुकानांमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Vedh News