चिंचवडमधील सावित्रीबाई फुले रुग्णालयात घरफोडी; ३.२० लाखांचे साहित्य चोरीला

चिंचवडमधील सावित्रीबाई फुले रुग्णालयात घरफोडी; ३.२० लाखांचे साहित्य चोरीला
Share

पिंपरी- चिंचवड गावातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या (तालेऱा रुग्णालय ) पहिल्या मजल्यावरील बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज मोहन खामगळ (वय ३७, व्यवसाय प्रोजेक्ट इंजिनिअर, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी चिंचवड गावातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात एसी आणि इलेक्ट्रिकल नूतनीकरणाचे कंत्राट घेतले होते. या कामासाठी आणलेले कॉपर पाईप, एसीची कॉपर वायरची बंडले आणि इतर साहित्य रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका बंद खोलीत ठेवण्यात आले होते.

१५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुमारे ३ लाख २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

या प्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी रात्री चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Vedh News