ब्रेकिंग न्यूज

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

Share

पिंपरी- शहरातील वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने लावण्यात आलेल्या ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट तसेच अनधिकृत लोगो वापरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दांडात्मक कारवाई सुरू केली आहे. 

वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावून वाहनातील व्यक्ती अथवा वस्तू स्पष्टपणे दिसणार नाहीत, अशा पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. त्याचबरोबर वाहनांवरील नंबर प्लेट नियमांनुसार न ठेवता आकर्षक किंवा वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.

अनावश्यक लोगो, विविध संस्थांची किंवा पदांची बोधचिन्हे असणाऱ्या वाहनावर देखील कारवाई सुरु केली आहे.