भोसरीमध्ये तीन खासगी बसला आग, १ बस जळून खाक

भोसरीमध्ये तीन खासगी बसला आग, १ बस जळून खाक
Share

पिंपरी – गॅरेजमध्ये दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक बसने पेट घेतला. या घटनेत तीन बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये एक बस पूर्णपणे जळून खाक झाली तर दोन बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना काल बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गवळी पार्किंग जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गवळी पार्किंगजवळ एका गॅरेजमध्ये बस दुरुस्तीचे काम सुरु होते. त्याचवेळी अचानक आग लागली. यात एक बस पूर्णपणे जळून खाक झाली तर अन्य दोन बसचे मोठे नुकसान झाले. पेटलेल्या बसमधून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र तसेच भोसरी, चोवीसावाडी, वल्लभनगर, मोशी, चिखली येथील प्रत्येकी एका बंबाने दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

Vedh News