पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; ६६ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीविरुद्ध गुन्हा

पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; ६६ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Share

पुणे- घरातील सर्वजण नवरात्रोत्सवाच्या आरतीसाठी बाहेर गेले असताना संधी साधून घराच्या बाहेर खेळत असलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी ६६ वर्षाच्या वृद्धाला ताब्यात घेतले आहे.

रांजणगाव परिसरात नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान घराजवळील नवरात्रोत्सवाच्या आरतीसाठी पीडित मुलीचे नातेवाईक आणि घरचे लोक बाहेर गेले होते. त्यावेळी ५ वर्षाची चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना संधी साधून शेजारीच राहणाऱ्या ६६ वर्षीय आरोपीने या चिमुरडीला आपल्या ताब्यात घेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या चिमुकलीने घाबरून तात्काळ मोठ्याने आरडाओरडा सुरू करताच आसपासचे लोक धावून आले आणि हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडित कुटुंबाची फिर्याद नोंदवून संबंधित ६६ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. या नराधमाविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

Vedh News