प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांच्याकडे मध्यप्रदेश भवनाच्या निवासी आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार

प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांच्याकडे मध्यप्रदेश भवनाच्या निवासी आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार
Share

नवी दिल्ली- भारतीय प्रशासकीय सेवेतील २००७ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन मध्य प्रदेश सरकारने त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली आहे. भोंडवे यांच्याकडे असलेल्या विद्यमान पदाबरोबरच दिल्ली येथील मध्यप्रदेश भवनाच्या निवासी आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सध्या ते मध्य प्रदेशच्या नगर प्रशासन व विकास विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रशासकीय समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

संकेत भोंडवे यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. दिल्लीतील प्रशासकीय कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असून केंद्र सरकारमधील विविध विभागाशी त्यांचा चांगला समन्वय आहे. भोंडवे यांची दिल्लीतील अतिरिक्त कार्यभारामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाशी थेट समन्वय साधणे शक्य होणार आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या केंद्र स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध विकास योजनांना मंजुरी मिळवणे, निधीसाठी पाठपुरावा करणे आणि सुरु असलेल्या प्रकल्पाबाबत समन्वय साधणे या कामामध्ये भोंडवे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

 

Vedh News