लाचखोर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे याला पोलीस कोठडी, एसीबीच्या तपासणीत आढळली २ कोटींची मालमत्ता

लाचखोर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे याला पोलीस कोठडी, एसीबीच्या तपासणीत आढळली २ कोटींची मालमत्ता
Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ३८ लाख रुपयांच्या टेंडर प्रकरणी १९ हजार रुपयांची लाच
मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना शुक्रवारी (दि. ३०) पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी ५७ वर्षीय ठेकेदाराने एसीबी कडे तक्रार दिली होती. त्यानंतर एसीबीच्या पडताळणीत ओंभासे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, त्यांना गुरुवारी अटक केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घेतलेल्या झाडाझडतीत बंगल्यासह रोकड, सोन्याचे दागिने, तीन कार अशी २ कोटी १९ लाख रूपये किमतीची मालमत्ता आढळून आली.

एसीबीने तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संभाषणातील आवाजाची पडताळणी करायची आहे. त्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणी अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी करायची आहे, अशी कारणे पोलिसांनी दिली. त्यावर न्यायालयाने ओंभासे यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Vedh News