ब्रेकिंग न्यूज

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून फायरिंगचा सराव केल्याप्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलिसांची कारवाई

Share

पुणे- बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून वाडेबोल्हाई येथे फायरिंगचा सराव केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पिंपरी सांडस येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एक पिस्तूल आणि एक राऊंड जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई सुधीर शिवले यांनी फिर्याद दिली असून ऋषीकेश वामन भोरडे (वय २७, रा. पिंपरी सांडस) आणि प्रणव संदीप भोरडे (वय १९, रा. पिंपरी सांडस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऋषीकेश भोरडे याच्याकडे पिस्तूल असून या पिस्तुलाने मित्राला सोबत घेऊन वाडेबोल्हाई परिसरात रात्रीच्या वेळी फायरिंगचा सराव केला अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर ऋषीकेश भोरडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि त्यामध्ये एक राऊंड आढळून आले. सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याने प्रणव भोरडे याच्यासोबत वाडेबोल्हाई येथे सराव केल्याची कबुली दिली. या प्रकरणी दोघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.