खेडच्या दुर्गम भागातील वंचितांची दिवाळी झाली गोड-भुगोल फाउंडेशनचा उपक्रम
पिंपरी -एक हात मदतीचा माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी या उपक्रमा अंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरणाच्या पश्चिमेकडील भागात निसर्गरम्य खेड पश्चिम भागातील चिखलगाव , माजगाव,कळमोडी या दुर्गम भागात आदिवासी कातकरी गरीब गरजू लोकांना दिवाळी फराळ व कपडे,लहान मुलांना कपडे व शालेय साहित्य देण्यासाठी जाऊन हा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या वसुंधरेने आपणास अनेक गोष्टी दिलेल्या…
