मोशी – येथील शिव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर एका आलिशान कारने अचानक पेट घेतला. गाडीच्या बॉनेटमधून आगीच्या ज्वाळा येऊ लागल्या. काही क्षणात आगीने तीव्र स्वरूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
