मागील वर्षी झालेल्या दांडियाच्या वादातून पिंपरीत दोन गटात तुंबळ हाणामारी

मागील वर्षी झालेल्या दांडियाच्या वादातून पिंपरीत दोन गटात तुंबळ हाणामारी
Share

पिंपरी- मागील वर्षी दांडिया पाहताना झालेल्या झालेल्या भांडणाच्या कारणावरून यावर्षी पुन्हा दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बुधवारी (दि. १४) रात्री बौध्दनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला, त्याचे पती व मुलगी दुकानासमोर बसलेले असताना आरोपींची जुन्या वादातून दगडफेक केली. या दगडफेकीत फिर्यादीची मुलगी जखमी झाली. आरोपींची दुकानाची तोडफोड करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच घरात घुसून साहित्याचे नुकसान केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे.

त्यानुसार सिध्दार्थ ऊर्फ चिमुकल्या गालफाडे (२०), दीपक ऊर्फ दिप्या केशव लोखंडे (१८), सुखदेव जेट्टीथोर (२१), प्रतिक अंकुटे (१९), प्रथमेश विष्णु हजारे ऊर्फ कि-या (१८), विशाल गालफाडे (२२), अभिषेक व्यंकट कांबळे (१९), गुड्या गालफाडे (२१), पवण राहुल आचार्य (१८, सर्व रा. बौध्दनगर पिंपरी) आणि दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात यश बाळासाहेब गायकवाड (रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान नरहरी माने (४८), साहील माने, निखील माने, महिला आरोपी (४०), विकास माने (बौध्दनगर पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बौध्दनगर येथे दांडियाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. मागील वर्षी दांडिया पाहण्यासाठी आल्यानंतर सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांचे आणि भगवान माने यांच्या कुटुंबियांचे भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणावरून या दोन्ही गटात यावर्षी पुन्हा दांडियाच्या वेळी हाणामारी झाली. एकमेकांना दगड आणि हाताने मारून दुकानाची तोडफोड करण्यात आली. माने यांच्या घरातील साहित्याचे नुकसान करण्यात आले. सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये यश गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Vedh News