ब्रेकिंग न्यूज

कामगारांची माहिती पोलिसांना न दिल्याने हॉटेल मालकाच्या विरुद्ध गुन्हे दाखल

Share

पुणे- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्यविषयक माहिती न दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी परिसरातील दोन हॉटेलचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणी हॉटेल नवनाथ ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई विनोद दीपक साळवे यांनी फिर्याद दिली आहे.याच स्वरूपाचा दुसरा गुन्हा हॉटेल व्यंकटेश अमृततुल्य ( गुलटेकडी) याच्या मालकाविरुध्द स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई युवराज अंकुश राठोड यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्यविषयक माहिती पोलीस ठाण्यात पुरविणे बंधनकारक असतानाही ती माहिती पोलिसांकडे सादर करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित आदेशाचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.