ब्रेकिंग न्यूज

डबल महाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर छापा

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडले. तर पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले आहे. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील…

Read More

विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार करा – विवेक सावंत

पिंपरी, पुणे  अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापनात आयसीटीचा वापर केला पाहिजे. आता शिक्षणातील तंत्रज्ञानाच्या परिवर्तनीय भूमिकेवर लक्ष केंद्रित करून २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नवनवीन अध्यापन तंत्रांचा स्वीकार केला पाहिजे असे आवाहन पीसीयू व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विवेक सावंत यांनी उपस्थित शिक्षकांना केले. यावेळी त्यांनी एआय आधारित लर्निंग सोल्यूशन्समध्ये शिक्षणाच्या आणि वैयक्तिक शिकण्याच्या संधींचे प्रात्यक्षिक…

Read More

परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा संपन्न

आळंदी:-  परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील रसिकलाल धारिवाल ,फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कौंटूंबिक स्नेह मेळाव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले तुमचं माझं नात मातीचे आहेच पण संघर्षाचे सुद्धा तुमचं माझं नाते आहे.माझा माझ्या कुटुंबाला कुटूंबात तसा आपल्या…

Read More

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेतादिन दिमाखात साजरा

देशाचे माजी राष्ट्रपती स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वृत्तपत्र विक्रेता दिन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ( पुणे – पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने रक्तदान उपक्रम राबवून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला . याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मा.श्री. विजयभाऊ पारगे , संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. दत्ताभाऊ पिसे ,संघाचे सचिव अरुण निवंगुणे ,कार्याध्यक्ष अनंता भिकुले…

Read More

एसबीपीआयएम ने नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. हे मानांकन मिळणे म्हणजे पीसीईटीच्या विश्वस्तांनी एसबीपीआयएमच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे. त्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीसीईटीचे…

Read More

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल…

Read More

निवडणूक आयोगाने शरद पवारांची ‘ती’ मागणी फेटाळली

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी फेटाळल्याचे सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ…

Read More

बाबा सिद्दीकींची हत्येमागील तीन कारणे पोलीस तपासात उघड

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या या तीन कारणांसाठी करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर…

Read More

धक्कादायक !! राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या

निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची…

Read More

महायुतीत धुसफूस आहे ? अजित पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याने अजित पवार रागात बैठक सोडून निघून गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अजित पवार यांना आज…

Read More