माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर ,प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांना राज्यस्तरीय यशवंत-वेणू सन्मान गौरव पुरस्कार जाहीर
पुणे -पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी कृषी, शैक्षणिक, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातात. यामध्ये आतापर्यंत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, दिलीप वळसे पाटील, डॉ.पी.डी.पाटील, यशवंतराव गडाख, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पोपटराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, ना.धो.महानोर, विठ्ठल वाघ, रावसाहेब…
