ब्रेकिंग न्यूज

भगवद्गीता जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ! -शंकर गायकर

पिंपरी – ‘भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नसून तो मानवी जीवन जगण्याचा मार्गदर्शक पथ आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते शंकर गायकर यांनी महासाधू मोरया गोसावी क्रीडासंकुल, चिंचवडगाव येथे केले. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल – पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आयोजित हिंदू स्वाभिमान मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शंकर गायकर…

Read More

सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र! – डॉ. संजय उपाध्ये

पिंपरी – ‘सुसंवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाचा मूलमंत्र आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न!’ या मासिक प्रवचनमालिकेतील अमृतमहोत्सवी ७५ वे प्रवचनपुष्प गुंफताना ‘विचार करूनच बोला!’ या विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर…

Read More

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान….

पिंपरी :- पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर झाले असून आज राज्यस्तरीय आयोजीत सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गीताचे लोकार्पण

पिंपरी -वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीतफुलोरा निर्मित ‘घरोघरी हवाच शिवबा’ गाण्याचे लोकार्पण नुकतेच शिवजयंतीच्या निमित्ताने विक्रम कुलकर्णी, सुगंधा शिरवळकर, आनंद दीक्षित, राहुल वाळंके, सचिन बोर्डे, पूनम पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. “दान मागते आयाबायांनो देशासाठी पुन्हा एकदा… घरोघरी हवाच शिवबा पुन्हा नव्याने पुन्हा एकदा…” असे बोल असलेल्या या गीताला…

Read More

साहित्यिक हा लोककलेचा आत्मा – रघुवीर खेडकर

पिंपरी – ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, ते समाजाला दिशादर्शक असते. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे!’ असे उद्गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी काढले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य…

Read More

सुर्वे माणुसकीचा कैवार घेणारे कवी! – डाॅ. श्रीपाल सबनीस

पिंपरी – ‘नारायण सुर्वे हे माणुसकीचा कैवार घेणारे कवी होते!’ असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस  यांनी आदर्शगाव हिवरेबाजार, जिल्हा अहिल्यानगर येथे काढले. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्पाचे…

Read More

इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘दिल की धडकन’ मैफलीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी – व्हॅलेंटाइन डे निमित्त  रोजी इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘दिल की धडकन’ या प्रणयरम्य हिंदी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीच्या निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहातील सादरीकरणाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राखी झोपे आणि अनिल झोपे या दांपत्याच्या संकल्पना आणि निर्मितीतून साकार झालेल्या या खास सांगीतिक मैफलीतविजय किल्लेदार – भारती किल्लेदार,किरण वैद्य – डॉ….

Read More

अमरनाथ सेवा ट्रस्ट पुणे भोसरी यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सवानिमित्त फराळ वाटप

भोसरी -पिंपरी चिंचवड शहरात महाशिवरात्री उत्सवा निमित्त भाविकांनी महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमरनाथ सेवा ट्रस्ट पुणे भोसरी यांच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्सवानिमित्त फराळ वाटप करण्यात आला. मोशी प्राधिकरण संतनगर आहार हॉटेल कॉर्नर या ठिकाणी भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला .सकाळी सात पासूनच भक्तांसाठी साबुदाणा खिचडी तसेच…

Read More

नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम व्हावे – योगेश सोमण

पिंपरी, पुणे – साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख…

Read More

उद्योजक हे राष्ट्राचे भाग्यविधाते! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी – ‘यशस्वी उद्योजक हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर राष्ट्राचे भाग्यविधाते आहेत!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळ्यात गिरीश प्रभुणे बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र…

Read More