आपला म्युझिकल ग्रुपचा ५० वा भाग सादर ; यानिमित्त पत्रकार व कलाकारांचा सन्मान

पिंपरी – आपला म्युझिकल ग्रुपचा ५० वा भाग नुकताच आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पिंपरी चिंचवडकर रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक तुषार सहाणे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवारांच्या हस्ते पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार श्रावण जाधव (सकाळ) अमोल काकडे (उपसंपादक पुण्यनगरी पिंपरी चिंचवड), बापूसाहेब गोरे (संपादक माझा आवाज), सुरज साळवे (संपादक लोकन्याय न्यूज), शबनम सय्यद (संपादिका शबनम न्यूज), माधुरी कोराड (अध्यक्ष पिंपरी चिंचवड महिला पत्रकार संघ), अनिल कातळे (संपादक वेध न्यूज), श्रीधर जगताप (संपादक प्रभाकर न्यूज) यांचा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच पर्यावरण पुरस्काराने विठ्ठल नाना वाळुंज यांना सन्मानित करण्यात आले. चित्रपट अभिनेत्री आर्या घारे, दैवशाला घाडगे, आयुब खान, अनिल गायकवाड यांना पुणेरी कलारत्न पुरस्कार व शशिकांत वाडते व सीमा पोडाला यांना कलाकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध गायक आणि गायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने कार्यक्रमात रंगत आणली आयोजक अनिल घाडगे, रणजीत पाटील, विजय कांबळे, संजय मिश्रा, प्रसाद माने, दत्ता लोहार, विकास जगताप, मोहन भस्मे व के संग्राम तसेच नेहा दंडवते, विद्या हजारे, सुषमा वनारसे, शुभांगी पवार, मंगल लोहार, छाया अय्यर, संगीता खरवडे, विद्या कोकणे, सीमा पोडाला या सुप्रसिद्ध गायकांनी आपल्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले.
ह्या कार्यक्रमात बालकलाकार दुर्वेश घाडगे काव्या वडतकर व प्रीता पाखरे यांच्या नृत्याने कार्यक्रमाची पातळी उंचावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल जगताप, उमाकांत पवार, शिवानंद मगदूम, अजिंक्य पोटे, अनिल बिरादार, मुबारक पानसरे व अनिल सौंदडे यांनी विशेष सहकार्य केले.
सूत्रसंचालन सीमा सुतार आणि नेहा दंडवते यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक अनिल घाडगे आणि सहआयोजक विजय कांबळे, रणजीत पाटील, विद्या हजारे, सुषमा वनारसे, यांच्या मार्गदर्शनाने हा संगीतमय सोहळा संपन्न झाला.






