भोर तालुक्यात पोलीस पाटलाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

भोर तालुक्यात पोलीस पाटलाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ
Share

भोर – भोर तालुक्यातील घोरेपडळ-सांगवी बुद्रुक येथे पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १६) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक येनपुरे हे शेतात काम करत असताना त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यावर व इतर ठिकाणी वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. खुनामागील कारण शोधणे, घटनेचा संपूर्ण घटनाक्रम उघड करणे आणि संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेणे, हे आता राजगड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

 

 

Vedh News