माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा ३६ वर्षानंतर एसटीचा प्रवास ; पहा व्हिडिओ

मंचर- राज्याचे माजी गृहमंत्री आणि नेते दिलीप वळसे पाटील यांनी तब्बल ३६ वर्षांनंतर एसटी बसने प्रवास करण्याचा आनंद घेतला. मंचर आगारात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ एसटी बसमधून त्यांनी रविवारी ( ता.१८ ) मंचर ते पारगाव कारखाना असा प्रवास केला.
मंचर आगाराच्या ताफ्यात नव्याने आलेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसचे लोकार्पण दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडले, त्यानंतर त्यांनी स्वतः बसचे पूजन करून हा प्रवास केला आणि प्रवाशांशी संवाद साधला. या प्रवासात त्यांच्यासमवेत सुमारे ५० प्रवासीही या प्रवासात सहभागी झाले होते. राजकारणाच्या धावपळीत अनेक वर्षे त्यांनी खासगी वाहनातून प्रवास केला. पण एसटीमधून प्रवास करणारे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाहून ज्येष्ठांनि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बस सुरू होताच वाहक सारिका गावडे यांनी वळसे पाटील यांच्यासह सर्व प्रवाशांचे स्वागत केले. त्यांनी स्वतःचा परिचय करून देत प्रवाशांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. माजी मंत्र्यांना आपल्या बसमधून प्रवास करताना पाहून प्रवाशांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती. पिंपळगाव-निरगुडसर येथे काही प्रवासी बसमध्ये चढले. त्यावेळी वळसे पाटील यांना बसमध्ये पाहून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. नेहमीच्या एसटी प्रवासात अचानक माजी गृहमंत्री सहप्रवासी म्हणून भेटल्याने प्रवाशांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.
सध्या दाखल झालेल्या ५ बससोबतच लवकरच अजून ५ नव्या एसटी बस मंचर आगाराला मिळणार आहेत.
View this post on Instagram






