राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पिंपरी चिंचवड शहरात विजयादशमी उत्सव व पथसंचलन

पिंपरी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा शहरांत विविध ५० ठिकाणी विजयादशमी उत्सव आणि २७ ठिकाणी पथसंचलन होणार आहे.
यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात दिनांक १८ , २०, २४ व २५ ऑक्टोबर रोजी चिंचवड, पिंपरी, काळेवाडी -रहाटणी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रावेत, आकुर्डी, वाकड, हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, संत तुकाराम नगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी, देहू, देहूरोड, चिखली, निगडी , संभाजी नगर, आळंदी, चऱ्होली, दिघी, मोशी, भोसरी , इंद्रायणी नगर भागातील विविध ५० स्थानी विजयादशमी शस्त्रपूजन उत्सव व २७ स्थानी पथसंंचलने होणार आहेत.
यावेळी शारीरिक व घोष प्रात्यक्षिके, गीत गायन यांसह पारंपरिक शस्त्रपूजन होईल. उत्सवांमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संघाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे.
विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवांमध्ये नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.






