ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन ; वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनाने चित्रपट रिकाना धक्का बसलेला असतानाच आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक मधू कांबीकर यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मधू कांबीकर यांचा कलाप्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा होता. लोककलेच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लोककलेपासून सुरु झालेला हा प्रवास पुढे नाटक आणि चित्रपटांपर्यंत विस्तारला. त्यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत ७५ हून अधिक चित्रपटांत आणि अनेक गाजलेल्या नाटकात काम केले.
मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथे झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘सतीची पुण्याई’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय आहेत. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस इथेही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. मधू कांबीकर यांच्या निधनाने चित्रपट, नाट्यसृष्टीत शोक व्यक्त होत आहे.





