सात मजली अनधिकृत इमारत उभी राहिली ; पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी बेखबर

सात मजली अनधिकृत इमारत उभी राहिली ; पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी बेखबर
Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवडमधील ड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळे गुरव परिसरात कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या तब्बल सात मजली अनधिकृत इमारतीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने धडक कारवाई करत ती पाडण्यास सुरुवात केली आहे. परंतु ही इमारत उभी राहात असताना महापालिकेचे अधिकारी झोपले होते की काय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

बांधकाम सुरु असताना बीट निरीक्षक, संबंधित अभियंता, आणि कार्यकारी अभियंता यांचे बांधकाम सुरुवातीच्या टप्प्यात असताना लक्ष कसे गेले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच नोटिसा बजावून अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेची पद्धत आहे का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

नागरिकांचा वाढता रोष आणि संताप पाहता, अखेर महापालिकेने या अनधिकृत आणि धोकादायक सात मजली इमारतीवर कारवाईचा बडगा उगारत बुलडोझर चालवला आहे. यामधून महापालिकेचा भोंगळ कारभार समोर आला असून वेळेत कारवाई न केल्यामुळे महापालिकेचा पैसा, वेळ आणि बांधकामाचे साहित्य याचे नुकसान होते याकडे महापालिकेचे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

नागरिकांचा वाढता रोष आणि संताप पाहता, अखेर महापालिकेने या अनधिकृत आणि धोकादायक सात मजली इमारतीवर कारवाईचा बडगा उगारत बुलडोझर चालवला आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Vedh News